‘सर्व शिक्षा अभियाना’ला विसर पडलेल्या वीटभट्टीवरील मुलांच्या गोष्टी...
वीटभट्टीवरील तुकड्या-टाकड्यांपासून बनवलेल्या कोप्या. एका ढांगेच्या कोपीत कंबरेपर्यंत वाकल्याशिवाय आत शिरता येत नाही. कुठल्याही वीटभट्टीवर गेल्यास प्रत्येकाला बऱ्यापैकी असंच चित्र दिसतं. त्यामुळेच आपल्या समाजातील दुर्लक्षित झालेल्या या मुलांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी वीटभट्टीवरील शाळेचा खटाटोप सुरू आहे. पुणे-सासवड रस्त्यावरील आक्सरवाडीमधील वीटभट्ट्यांवर या शाळा भरवल्या जातात.......